ठाणे पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील विधी अधिकारी गट "ब" आणि विधी अधिकारी यांची रिक्त पदे भरण्याकरीता दिनांक ०१/०८/२०२६ रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली होती. सदर परिक्षेचा निकाल दिनांक ०५/०८/२०२६ रोजी जाहीर करण्यात आला आहे. विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी परिक्षा -२०२६ जाहीरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या निकषानुसार खालील नमूद उमेदवार मुलाखत चाचणीकरीता पात्र ठरत असून त्यांना मुलाखतीस खालील ठिकाणी व दिनांकास बोलविण्यात येत आहे. मुलाखतीचे ठिकाण : विमर्श हॉल, चौथा मजला, पोलीस आयुक्त कार्यालय, कळवा ब्रिज जवळ, ठाणे, ४००६०१ दिनांक- १२.०८.२०२६, वेळ - सकाळी ११.३० वाजता.