Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 

 

 

WELCOME TO THANE POLICE
The Commissioner of Police, Thane

Shri.Vivek Phansalkar (IPS)

 

प्रिय ठाणेकर बंधू भगिनींनो ...

    मी दि. ३१-०७-२०१८ रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. हा पदभार सांभाळताना सुमारे पावणे दोन वर्षांचा कालावधी आपल्या सर्वांच्या सहकार्याने व सक्रिय सहभागाने पार पडला याचा मला निश्चितच आनंद आहे. या पावणे दोन वर्षाच्या कालावधीत ठाणे शहर पोलिसांनी लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, गणेशोत्सव, रमजान, नवरात्र या सारखे सण उत्सव कोणतेही गालबोट न लागता आपल्या सहकार्याने पार पाडले. गुन्हेगारीवर नियंत्रण तसेच दोषसिद्धीमध्येही वाढ दिसत आहे.

    सध्या संपूर्ण जग हे Covid-19 सारख्या जागतिक महामारीच्या संकटाला सामोरे जात आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून भारतात तसेच महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर केलेला आहे. या २ महिन्याच्या लॉकडाउनच्या कालावधीत ठाणे शहर पोलीस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र आपल्या रक्षणासाठी रस्त्यावर काम करीत आहेत. लॉकडाउनमध्ये अडकलेले गरजू मजूर, महिला, बालक, जेष्ठ नागरिक यांना ठाणे शहर पोलीस सर्वोतोपरी मदत करत आहेत. हजारो परप्रांतीयांना त्यांच्या मायभूमीकडे जाण्यासाठी संबंधित विभागाशी समन्वय साधून मदत करीत आहेत.

    या कालावधीत ठाणेकरांनीही प्रशासनाला व पोलिसांना अभूतपूर्व सहकार्य केलेले आहे. त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण या परिस्थितीचा मोठ्या धैर्याने व संयमाने घरी राहून सामना करीत आहात. याबद्दल आपले कौतुकच आहे. येणारा आगामी काळ हा आपल्या सर्वांसाठी कसोटीचा ठरणार आहे. लॉकडाऊन शिथिल करण्यात आले तरी आपल्याला आपली स्वतःची, आपल्या कुटुंबियांची पर्यायाने आपल्या समाजाची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. सोशल डिस्टंसिंग, वैयक्तिक व सार्वजनिक स्वछता, मास्कचा वापर व गर्दीची ठिकाणे टाळणे या नियमांचे काटेकोर पालन केल्यास आपण नक्कीच करोनावर मात करू असा मला विश्वास आहे.

    सुरक्षित व निर्भय ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर हा ठाणे पोलिसांनी केलेला संकल्प आहे आणि तो सिद्धीस नेण्यास आपल्या सगळ्यांचे सहकार्य व सहभाग अपेक्षित आहे.
धन्यवाद !

शुभेच्छापूर्वक-----
विवेक फणसळकर
पोलीस आयुक्त, ठाणे शहर

 

CP & Jt.cp Thane will be available for visitors during working days between 15:30 hrs & 17:30 hrs without prior appointment.

Indian Police Web Site(www.police.gov.in)

 

Notification for compulsion of using masks at public places

Latest News
 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 
 
Căutare semne
Home | Hall of Fame | Welfare Activities | Crime Statestics | FAQ's | Important Contacts   |
©2016. All Rights Reserved.
Designed & Developed by Khoj Infotech