३० मार्च, २०२६
महाराष्ट्र शासनाच्या "१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रम" अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयास राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त! 🏆 ही केवळ कामगिरी नसून, सेवा, समर्पण, समन्वय आणि स्मार्ट प्रशासनाचा सन्मान आहे. नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित पोलीस सेवेकडे वाटचाल करताना ठाणे पोलिसांनी आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. या यशामध्ये योगदान देणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे हार्दिक अभिनंदन! ठाणे पोलीस — तंत्रज्ञानासह विश्वास, सेवेत सदैव पुढे.