उत्तर-पूर्व भारतातील विविध राज्यांमधून शिक्षण, नोकरी व करिअरसाठी महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थी व तरुण व्यावसायिकांसोबत थेट संवाद साधण्याचा लोकाभिमुख उपक्रम ठाणे पोलिसांकडून राबविण्यात आला. प्रजासत्ताक दिन २०२६ निमित्त आयोजित या संपर्क कार्यक्रमातून विश्वास, सुरक्षितता आणि आपलेपणाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठाणे पोलीस — संवेदनशील, काळजीवाहू आणि सर्वसमावेशक 🚓🇮🇳 आपण सर्व भारतीय आहोत, हा समान धागा अधिक बळकट करणारा हा उपक्रम.