"पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणारा स्तुत्य उपक्रम – ‘वेलनेस सेंटर’ चे भिवंडी येथे शुभारंभ!" मा. अपर पोलीस आयुक्त श्री. विनायक देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न ✅
मा. पोलीस आयुक्त, ठाणे श्री. आशुतोष डुंबरे यांचे संकल्पनेतून व मा. पोलीस सह आयुक्त श्री. ज्ञानेश्वर चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या भावनिक व मानसिक स्वास्थ्याच्या गरजांकडे लक्ष देण्यासाठी 'वेलनेस सेंटर' हा उपक्रम आज दिनांक २६/०९/२०२५ रोजी पोलीस उपायुक्त परिमंडळ २, भिवंडी कार्यालय येथे सुरू करण्यात आला आहे. आहान फाउंडेशनच्या फाउंडर अँड सीईओ सोनाली पाटणकर, श्री उन्मेश जोशी व श्री स्वप्निल पांगे यांनी या उपक्रमासाठी पोलीस विभागासोबत संयुक्तपणे हा उपक्रम सुरू केला आहे. आहान फाउंडेशन सन २०१२ पासून नोंदणीकृत ट्रस्ट असून मुलांच्या व वयस्कांच्या भावनिक आणि मानसिक स्वास्थ्याच्या गरजांकडे लक्ष देण्यासाठी तसेच त्यांना वाढ, विकास आणि मानसिक सक्षमता यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्य करते. मानसिक आरोग्याविषयी जागरुकता, प्रारंभिक हस्तक्षेप आणि क्षमता वृद्धीवर आधारित संरचित कार्यक्रमांच्या माध्यमातून मुले, व्यक्ती, कुटुंबे आणि समुदाय यांना सक्षम करतात. मुलांच्या सर्वागीण विकासाला प्रोत्साहन देणे, समुदायांना महत्त्वाच्या सामाजिक विषयांबाबत संवेदनशील करणे आणि सामूहिक कृतीद्वारे सकारात्मक बदल घडवून आणणे हे ध्येय आहे. आहान फाउंडेशन ५ राज्यात शासनाबरोबर मानसिक आरोग्य संदर्भातील विविध कार्यक्रम राबवत आहेत. यात प्रामुख्याने रिस्पॉन्सिबल नेटिझम, सायबर वेलनेस सेंटर, ऑटिझम संदर्भात जनजागृती व प्रशिक्षण, मानसिक आरोग्य सेवा हे उपक्रम राबवित आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ २, भिवंडी कार्यालयातील वेलनेस सेंटरचे उद्घाटन मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे) श्री. विनायक देशमुख यांचे हस्ते झाले असून त्यावेळी पोलीस उप आयुक्त, श्री. शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त श्री. सचिन सांगळे, व श्री. विजय मराठे, तसेच परिमंडळ २ मधील सर्व ६ पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते. आहान फाउंडेशनचे फाउंडर व सी. इ. ओ सोनाली पाटणकर, श्री. उन्मेष जोशी, श्री. स्वप्निल पांगे यांनी परिमंडळातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सदर उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. सदर उपक्रमास डॉ. श्रीकांत परोपकारी पोलीस उपायुक्त (मुख्या-१) यांनी मोलाचे सहकार्य केले.