ठाणे पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानात सुरक्षित वाहतुकीबरोबरच विना अपघात वाहने चालवण्याचा डंका वाजवण्यासाठी "ठाणे कार्निव्हल" चे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्याच्या साकेत मैदानात प्रजासत्ताक (२६ जाने.) दिनापासुन तीन दिवस होणाऱ्या कार्निव्हलमध्ये वाहतुक नियमांविषयी जनजागृतीपर विविध कार्यक्रमांसह ई वाहने, सुपर बाईक्स आणि व्हिन्टेज कारचे भव्य प्रदर्शन पाहण्याची संधी ठाणेकरांना लाभणार आहे. २६ ते २८ जानेवारी या कालावधीत सर्वांसाठी खुले असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.