पोलीस दलावरील जनतेचा विश्वास दृढ करण्यासाठी आणि पोलीसांच्या कामकाजाबाबत पारदर्शकता आणि जागरुकता वाढवण्यासाठी महाराष्ट्र राज्य कायदेशीर विधी सेवा प्राधिकरण (MSLSA), ठाणे जिल्हा कायदेशीर विधी सेवा प्राधिकरण (DLSA) आणि ग्लोबल केअर फाउंडेशन, मुंबई यांच्या सहकार्याने "माझे पोलीस स्टेशनला भेट द्या" या नावाने एक सार्वजनिक पोहोच उपक्रम आयोजित करत आहे. या कार्यक्रमाचा उद्देश नागरीक आणि पोलीसांमधील दरी कमी करणे आहे, ज्यामुळे रहिवाशांना त्यांच्या संबंधीत पोलीस ठाण्यांना खुल्या, स्वागतार्ह आणि संवादात्मक वातावरणात भेट देण्यास प्रोत्साहित केले जाईल. या उपक्रमामुळे गैरसमज दूर होतील, जतनेचा विश्वास वाढेल आणि कायदेशीर मदत सेवा आणि नागरिकांच्या हक्कांबद्दल जागरुकता निर्माण होईल.