ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान २०२६’ अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘Traffic School on Wheels’ या अभिनव उपक्रमामध्ये ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ हा केवळ घोषवाक्याचा विषय नसून, प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी जोडलेली जबाबदारी आहे. वाहतूक नियमांचे महत्त्व केवळ दंडाच्या भीतीपोटी नव्हे, तर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाच्या सुरक्षेसाठी नागरिकांच्या मनात रुजले पाहिजे. यासाठी वाहतूकविषयक शिक्षण नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचविणारा ‘Traffic School on Wheels’ हा उपक्रम फिरत्या वाहतूक शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी, वाहनचालक, व्यावसायिक चालक तसेच सामान्य नागरिकांना वाहतूक नियम, सुरक्षित वाहनचालकाचे वर्तन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादा, सिग्नलचे पालन, लेन शिस्त तसेच मद्यपान करून वाहन चालविण्याचे गंभीर परिणाम याबाबत आधुनिक पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येणार आहे.