ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सिद्धी हॉलची सुविधा ही पोलीस कल्याण निधी अंतर्गत उपलब्ध आहे. सदर हॉल पोलीस अधिकारी/अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी आणि वर्ग ४ चे कर्मचारी, जे पोलीस कल्याण निधीचे सभासद आहेत, यांच्यासाठी लग्नसमारंभ तसेच इतर कार्यक्रमांच्या आयोजनासाठी भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यात येते. आत्तापर्यंत सिद्धी हॉलचे आरक्षण करण्यासाठी संबंधितांनी कार्यालयात येऊन अर्ज सादर करावा लागत असे. सध्या, दिनांक २३/१०/२०२५ पासून हॉलचे आरक्षण ऑनलाईन पद्धतीने करता येईल. आरक्षणाची ही नवीन प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे. ऑनलाईन बुकिंग कसे करावे? सिद्धी हॉलचे बुकिंग करण्यासाठी खालील संकेतस्थळावर भेट द्यावी: 🔗 https://siddhihall.thanepolice.in वापरकर्त्यांनी या वेबसाईटवर लॉगिन करून आवश्यक त्या माहितीच्या आधारे ऑनलाईन अर्ज सादर करावा.