🚦 रस्ता सुरक्षा अभियान २०२६ – ठाणे पोलीस 🚦 दिनांक १०/०१/२०२६ रोजी गडकरी रंगायतन, ठाणे येथे ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून रस्ता सुरक्षा अभियान २०२६ कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमास मा. पोलीस आयुक्त ठाणे श्री. अशुतोष डुंबरे, मा. आयुक्त ठाणे महानगरपालिका श्री. सौरभ राव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सिनेअभिनेते श्री. श्रेयस तळपदे व प्रतिष्ठित उद्योजक श्री. अभिजित गणू यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, पालक व NSS स्वयंसेवकांनी पथनाट्य व संदेशपर उपक्रमांद्वारे नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्व प्रभावीपणे पटवून दिले. 🚦 सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन आवश्यक 🚦 #RoadSafetyAbhiyan #ThanePolice #TrafficPolice #RoadSafetyAwareness