७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. तसेच पोलीस आयुक्तालय ठाणे शहर येथे देखील ध्वजारोहण संपन्न झाले.
मा.पोलीस आयुक्त श्री.आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून पोलीस दलात खंबीरपणे कर्तव्य पार पाडणाऱ्या महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकरिता "महिला पोलीस विश्रामिका" नावाने फिरत्या व्हॅनचे अनावरण श्रीमती सुलभा पाटील, सहा.पोलीस आयुक्त, नियंत्रण कक्ष यांच्याहस्ते करण्यात आले.