पोलीस दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान विभाग

Police Communication and Information Technology Department Photo

आमच्या विषयी


पोलीस दळणवळण आणि माहिती व तंत्रज्ञान विभाग ही पोलिसांची तांत्रिक शाखा असून माननीय पोलीस आयुक्त मुख्यालय - २ यांच्या देखरेखीखाली कार्यरत आहे. पोलीस दळणवळण आणि माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून अखंडितपणे २४ तास दळणवळण आणि माहिती व तंत्रज्ञान यंत्रणा पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखणेकरिता पुरविले जाते. पोलीस दलाच्या तांत्रिक गरजांकरिता पोलीस बिनतारी संदेश विभागाची मदत घेतली जाते. तसेच तांत्रिक सेवा पुरविण्याच्या अन्य विभागांशी, संस्थांशी दळणवळण व माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत समन्वय ठेवून पोलीस दलाकरिता अखंडित व सुरळीत तांत्रिक सेवा उपलब्धतेसाठी समन्वय ठेवला जातो.

ठाणे पोलीस आयुक्तालयातील सीसीटीव्ही यंत्रणा ही पोलीस दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान या विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत. तसेच ठाणे पोलीस दलाचे संकेतस्थळाचे अद्ययावत करण्याचे कामकाज पोलीस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान या विभागाचे अंतर्गत करण्यात येते. थोडक्यात पोलीस दळणवळण माहिती व तंत्रज्ञान विभाग हा पोलीस खात्याचा कणा आहे