About Us
1) स्थापना:- ठाणे शहर बी.डी.डी.एस. पथक सन 1996 पासुन कार्यरत आहे.
2) स्थापना उद्देष:- दहशतवादी हल्ला, संषयित वस्तु, व्ही.व्ही.आय.पी./व्ही.आय.पी., धार्मिक स्थळे, सण उत्सव, मोर्चे, गर्दीची ठिकाणे, माॅल व अतिसंवेदनषिल ठिकाणे इत्यादी ठिकाणी घातपात विरोधी तपासणी करणे तसेच संशयित वस्तुमध्ये स्फोटके आढळुन आल्यास त्यांचा सुरक्षितरित्या सुरक्षित ठिकाणी नाष करणे.
3) श्वानांची संख्या व नावे:- एकुण 05 श्वान
1) श्वान ज्वेल 2) श्वान अॅलेक्स 3) श्वान टायगर 4) श्वान जॅक 5) श्वान चार्ली
4) पो.अधिकारी व कर्मचारी संख्या:- 5 अधिकारी व 45 कर्मचारी
5)थोडक्यात माहिती:- ठाणे बीडीडीएस पथकाकडे बाॅम्ब शोध व नाष करणेकरिता अत्याधुनिक साधनसामग्री उपलब्ध असुन 02 अत्याधुनिक वाहनांसह 05 वाहने आहेत. पथकामध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण केलेले कर्मचारी आहेत. दिवसा व रात्रौ करीता असे दोन पथक ठाणे येथे कार्यरत असतात आणि कल्याण येथे दिवसपाळी करीता एक पथक कार्यरत असते. . बी.डी.डी.एस. पथकाकडुन आयक्तालयातील महत्वाची मर्मस्थळांची, धार्मिक ठिकाणे इत्यादींची नियमित तपासणी केली जाते. त्याशिवाय रेल्वे स्टेशन, माॅल, धार्मिक स्थळे यासारख्या गर्दीच्या ठिकाणी आश्यकतेनुसार घातपात विरोधी तपासणी केली जाते. अतिमहत्वाचे व्यक्तींचे दौऱ्याप्रसंगी त्यांचा मार्ग, निवास व कार्यक्रमाचे ठिकाण या ठिकाणी घातपात विरोधी तपासणी केली जाते. तसेच संशयित वस्तुबाबत नियंत्रण कक्ष, पोलीस ठाणे किंवा कोणाहीमार्फत माहिती मिळाल्यास संशयित वस्तुची घातपात विरोधी तपासणी करून त्यात स्फोटके असल्यास सुरक्षितरित्या सुरक्षितठिकाणी नाष करण्यात येतात.या व्यतिरीक्त महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी आवश्यकता असल्यास घातपात तपासणी,व्हीव्हीआयपी व्हीआयपी यांचे दौरे/कार्यक्रम, उत्सव, सण, या प्रसंगी वरिष्ठ कार्यालयाचे आदेशाने बी.डी.डी.एस.पथक जाते.