About Us
जलद प्रतिसाद पथक , ठाणे शहर
महाराष्ट्र राज्यात २६ / ११ / २००८ रोजी झालेल्या मुंबई अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी कारवायांस त्वरित वेगाने व परिणामकारक आळा घालण्यासाठी पोलीस दलातील प्रशिक्षित, गतिमान सुदृढ, धाडसी, शस्त्रांनी सुसज्ज, जीव धोक्यात घालून प्रसंगी जिवावर उदार होऊन दहशतवादी कारवायांना सामोरे जावू शकतील अशा पोलीस अधिकारी व अंमलदारांमधून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या ( National Security Guard ) धर्तीवर Force One ची स्थापना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातील प्रत्येक पोलीस घटकात दहशतवादी हल्ल्याला तातडीने प्रत्युत्तर देण्यासाठी दि. ३१ / ०८ / २००९ रोजीपासून जलद प्रतिसाद पथक ( Quick Response Team ) या जलद कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे .
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर कार्यान्वित असलेले जलद प्रतिसाद पथक हे दहशतवादी कृत्यांविरुद्ध प्रभावी कृती करण्यासाठी अत्यंत कमी वेळेत जलद हालचाली करून घटनास्थळवरील सामरिक माहिती गोळा करण्यासाठी कारवाई करते. संभाव्य धोका निष्क्रिय करते व प्रसंगी हे पथक ओलीसांची सुटका करतात. केंद्रीय सुरक्षा दलांना आणि राज्य सुरक्षा दलांना शासकीय कर्तव्यात स्थानिक पातळीवर सहाय्य प्रदान करतात .
मुख्य नियंत्रण कक्ष , ठाणे यांचेकडून कोणत्याही संभाव्य दहशतवादी कारवायांची माहिती प्राप्त होताच जलद प्रतिसाद पथक सदर दहशतवादी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यास सदैव सज्ज असतात.