🚔 ठाणे पोलिसांची पारदर्शकतेकडे एक पाऊल पुढे! 'स्मार्ट HQ मॅनेजमेंट' अ‍ॅपद्वारे आता कर्मचारी कुठे आहेत, काय ड्युटी आहे याची माहिती ऑनलाईन उपलब्ध! नवीन अ‍ॅपमुळे नियंत्रण, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढणार. 👮‍♂️📱 दिनांक १३/०९/२०२५ रोजी #ThanePolice #SmartPolicing

🚔 Thane Police takes a step towards transparency! Now, through the 'Smart HQ Management' app, information about where employees are and what their duties are is available online! The new app will increase control, accountability and efficiency. 👮‍♂️📱 Dated 13/09/2025 #ThanePolice #SmartPolicing
दिनांक ११/०९/२०२५ रोजी ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस मुख्यालय येथे SMART HQ DUTY MANAGEMENT APPILICATION या अॅपचे उद्घाटन डॉ. श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सह आयुक्त, ठाणे यांच्या हस्ते करण्यात आले. सदरवेळी श्री. श्रीकांत पाठक, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन), डॉ. श्रीकांत परोपकारी, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय १, श्री. प्रविण बनसोड, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय-२ तसेच पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी/अंमलदार व बिनतारी संदेश विभागातील पोलीस अधिकारी /अंमलदार उपस्थित होते. सदर अॅप्लीकेशन मुळे वेळेचे नियोजन, कर्तव्यामध्ये पारदर्शकता, हजेरी व्यवस्थापन जलद गतीने करण्याकरिता, कर्तव्याचे नियोजन जलद गतीने होण्यास मदत होणार आहे. तसेच पोलीस अधिकारी / अंमलदार यांना त्यांना नेमण्यात येण्या-या कर्तव्याची माहिती जलद गतीने त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. या व्यतिरिक्त कर्तव्यावर हजर असलेले अंमलदार, केलेली कार्यवाही व कार्यमुक्त याचा अहवाल सदर अॅप्लीकेशनमुळे उपलब्ध होणार आहे. पोलीस अधिकारी/अंमलदार यांना मुख्यालय येथे हजेरीसाठी येण्याची गरज लागणार नाही. सदर अॅप व्दारे हजर मनुष्यबळाची माहिती तात्काळ मिळणार असल्याने पोलीस अंमलदारांचा बहुमुल्य वेळेची बचत होणार आहे. तसेव वरिष्ठ पोलीस अधिका-यांना हजर मनुष्यबळ व कर्तव्यावर नेमलेल्या माहितीचा अहवाल एका क्लिकव्दारे उपलब्ध होणार आहे. सदर SMART HQ DUTY MANAGEMENT APPILICATION अॅप पोलीस मुख्यालय येथे चालु करण्यात आल्यामुळे पोलीसांच्या दैनंदिन कर्तव्यात पारदर्शकता व वेळेची मोठया प्रमाणात बचत होणार असल्याने पोलीस अंमलदारांनी समाधान व्यक्त केले आहे.